सांगोला भाजपच्या वतीने महूद येथे सावरकर जयंती साजरी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी सांगोला तालुका यांच्या वतीने महुद येथे प्रतिमेचे पूजन किरण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांनी देशासाठी केलेले कार्य मोलाचे असल्याचे सांगून त्यांचे कार्यकृतुत्व पुन्हा पोहचविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी किरण चव्हाण,हिमालय देशपांडे, भारत यमगर, शुभम लीवाटने,अमित सुतार,मारुती चौगुले,प्रज्वल जाधव,विजयकुमार भोसले, विजयकुमार देशमख,पियूष कुमार, सोयजित केदार,बाळासो चव्हाण, विनोद उबाळे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.