सांगोला तालुका

मराठा सेवा संघाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी शिवश्री शहाजीराव इंगोले व कार्याध्यक्षपदी शिवश्री इंजि.ब्रह्मदेव पवार यांची वर्णी 

मराठा सेवा संघाच्या सांगोला तालुका पदाधिकारी निवडीची बैठक दिनांक 27 मे 2023 रोजी दैनिक सांगोला नगरीच्या कार्यालयात पार पडली यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सदर बैठकीत मराठा सेवा संघाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी ग्रामविकास अधिकारी शिवश्री शहाजीराव महादेव इंगोले भाऊसाहेब कार्याध्यक्षपदी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सांगोला मधील अभियंता शिवश्री ब्रह्मदेव विश्वनाथ पवार साहेब तर सचिव पदी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सांगोला मधील अभियंता शिवश्री अपूर्व आनंद थिटे साहेब यांची एकमताने निवड करण्यात आली.
सदर निवडीसाठी मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष मा. शिवश्री उत्तमराव माने शेंडगे साहेब, पंढरपूर विभाग जिल्हा अध्यक्ष शिवश्री तात्यासाहेब पाटील व सदर निवडीप्रसंगी निरीक्षक म्हणून शिवश्री रवींद्र बापू पवार व शिवमती वनिता कोरटकर हे पदाधिकारी उपस्थित होते.सदर बैठकीसाठी माजी नगरसेवक मा. शिवश्री सतीशभाऊ सावंत, शिवश्री रामभाऊ मिटकल, शिवश्री शिवाजी गवळी,शिवश्री प्रताप  इंगोले, शिवश्री बापूसाहेब भाकरे, शिवश्री विजयसिंह सुरवसे, शिवश्री अशोकभाऊ शिनगारे ,शिवश्री प्रताप देशमुख, शिवश्री बंडू निंबाळकर, शिवश्री संदीप गिड्डे,  शिवश्री धनाजी शिकारे, शिवश्री गुरुदेव जावीर,शिवश्री रोहित शिकारे, शिवश्री वैभव शिकारे,शिवश्री धनाजी महांकाळ,शिवश्री विजय ज्ञानू पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.  नूतन तालुकाध्यक्ष शहाजीराव इंगोले व कार्याध्यक्ष इंजि. ब्रह्मदेव पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सदर पदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले तसेच मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी योगदान देण्याची ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!