डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2024-25 साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
उप सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मुंबई यांचेकडील पत्र दि.19 जुलै 2024 अन्वये जिल्हास्तरावर सन 2024-25 मध्ये डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना यशस्वीपणे राबविणेसाठी जिल्हयातील मदरशांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागणी करण्यात येत आहे.
जिल्हयातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणी करून तीन वर्षे झालेल्या आणि अल्पसंख्याक बहुल जिल्हयातील व तालुक्यातील मदरशांना डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून जिल्हयातील मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विदयार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारीक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रज व उर्दू या विषयांचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणा-या इ.9 वी, इ.10 वी व इ.12 वी तसेच औदयोगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणा-या विदयार्थ्यासाठी शिष्यवृत्ती देणे, परिणामी विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होऊन त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल या दृष्टिने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांचे मानधन अनुदानासाठी पात्र असलेल्या मदरश्यांनी अल्पसंख्याक विकास विभाग, शासन निर्णय दि.11 नोव्हेंबर 2010 व अल्पसंख्याक विकास विभाग, शासन परिपत्रक दि.28 डिसेंबर 2015 मधील अटी व शर्ती पूर्ण करणा-या पात्र मदरशांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद, सोलापूर, यांच्या मार्फत परिपूर्ण प्रस्ताव दि.15 सप्टेंबर 2024 अखेर सायंकाळी 05 वाजेपर्यत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय. सोलापूर येथे सादर करावेत, असे