सांगोला तालुका

महीम सोसायटीच्या नूतन चेअरमन व व्हा.चेअरमनचा जवळा येथे सत्कार 

राज्यातील एक आदर्श विविध कार्यकारी सहकारी सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवळा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिम ता. सांगोला सोसायटीच्या नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन तसेच संचालकांनी काम करावे, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी महीम सोसायटीच्या नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना दिला. जवळा ता. सांगोला येथे सोसायटीच्या कार्यालयात महिम सोसायटीचे नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
महिम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे नूतन चेअरमन हणमंत कारंडे व व्हा.चेअरमन गणेश मरगर यांचा मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील आणि जवळा विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या वतीने रविवार दि २८ रोजी करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते अरुणभाऊ घुले, जवळा सोसायटीचे चेअरमन अनिल साळुंखे, माजी उपसरपंच बाबा इमडे, सुनील आबा साळुंखे, दत्तात्रय बर्वे, अशोक भोसले आदीसह महिम विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक नागनाथ लवटे, बाळासाहेब घोगरे, सिताराम शिरगिरे, श्रीकांत चौगुले सुरेश महापुरे आदींसह पांडुरंग कारंडे, विलास कारंडे, सोमनाथ मरगर, बिभीषण पाटील, उत्तम कारंडे गुरुजी, दादासाहेब काळे यासह जवळा आणि महीम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक आणि सभासद उपस्थित होते.
थकीत कर्ज तसेच पारदर्शक कामकाजाचा अभाव या समस्या राज्यातील सर्व सहकारी सोसायटीसमोर उभ्या आहेत. गेली अनेक वर्ष जवळा विविध कार्यकारी सहकारी संस्थेने शंभर टक्के कर्ज वसुली सभासदांना सोने तारण योजना पिग्मी वर कर्ज योजना तसेच राज्यातील नामांकित बँकांच्या सेवा सुविधा पुरवतात त्या सेवा देऊन मूल्यांकनातही अनेक वर्षांपासून तो दर्जा जोपासला आहे. राज्यातील पहिल्या ३ विविध कार्यकारी सहकारी संस्थांत म्हणूनच जवळा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा समावेश होतो. महिम येथील नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन व सोसायटीच्या संचालकांनी जवळा सोसायटीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. सोसायटीचे कामकाज करत असताना आपण सर्वतोपरी नूतन संचालक मंडळास सहकार्य करू लवकरात लवकर मोहीम सोसायटीला स्वतःचे कार्यालय मिळण्याबाबत आपण प्रयत्न करू असेही यावेळी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!