सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

आ.शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोळा येथे बैलगाडी शर्यत उत्साहात संपन्न

कोळा (प्रवीण कुलकर्णी ):-कोळा गावचे युवा उद्योजक रावसाहेब आलदर व मित्र परिवाराने बैलगाडी शर्यत आयोजन करून एक चांगले व कौतुकास्पद काम केले आहे.  भव्य दिव्य गर्दीमध्ये मैदानावर माझा केक कापून वाढदिवस साजरा केला त्याचे मला समाधान असून वाटले असून कोळे गावाची नाळ गेल्या 40 वर्षापासून जोडली आहे. ही नाळ  कधीच तुटणार नाही. सत्ता असो वा नसो या गावावर माझे मनापासून प्रेम आहे. कोळा गावाची शेवटपर्यंत सेवा करत राहणार असल्याचे विचार आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले.

आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीची सुरुवात माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सत्कारमूर्ती आ.शहाजी बापू पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, संभाजीतात्या आलदर, युवा उद्योजक रावसाहेब आलदर यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. खास.रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांच्यावर जेसीबीतुन पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते शर्यत सुरू करण्यात आली. रावसाहेब आलदर व कोळा ग्रामस्थांच्या वतीने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी समस्त कोळे ग्रामस्थ युवा उद्योजक रावसाहेब आलदर मित्र परिवाराच्यावतीने  आ.शहाजीबापू पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

जनरल ब गट तसेच आदत अशा तीन गटात भव्य बैलगाडी शर्यतीचे तीन गटामध्ये ही बैलगाडा शर्यत सुरू झाली.बैलगाडीच्या जनरल ब गटामध्ये प्रथम क्रमांक कागल महावीर,  द्वितीय क्रमांक जयसिंग यमगर रांजणी, तृतीय क्रमांक बंडा वनवसे सिद्धेवाडी त्याचप्रमाणे बैलगाडा आदत गटामध्ये प्रथम क्रमांक अरविंद गोरड अलकुड, द्वितीय क्रमांक श्री लक्ष्मण कुटकोळी, तृतीय क्रमांक पांडुरंग माने अंकले हे बैलगाडा विजेते झाले आहेत.

बैलगाडी शर्यतीमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, सोलापूर आणि कर्नाटकातील बैलगाडा मालकांनी सुमारे 80 ते 90 बैलगाडा धारकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. नेहमीच चुरशीची होणारी हरण्या आणि गलब्या यांचे बैलगाडा शर्यतीचे खास आकर्षण होते. हरण्या आणि गलब्याची अटीतटीची शर्यत बघण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोळा येथे बैलगाडा शर्यती पाहण्याची संधी लाखो रसिकांनी अनुभवली. यावेळी  बैलप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होते.

बैलगाडा शर्यती यशस्वी करण्यासाठी कोळा ग्रामस्थ व युवा उद्योजक रावसाहेब आलदर मित्र परिवार यांच्यासह  बैलगाडा पंच म्हणून पंढरी आलदर, सयाप्पा सरगर ,गंगाराम पुजारी, दत्ता सरगर, सचिन चोरमुले, चक्रीवादळ दत्ता सरगर,दत्ता आलदर यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास कोळा पंचक्रोशीतील पंचक्रोशीतील सर्व नेतेमंडळी पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक चेअरमन चेअरमन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक माजी सभापती संभाजी आलदर तर आभार युवा उद्योजक रावसाहेब आलदर यांनी तर उत्कृष्ट सूत्रसंचालन आबा आलदर यांनी केले.

युवा उद्योजक रावसाहेब आलदर यांनी जिप्सीतून केले सारथ्य 
कोळा येथील बैलगाडी शर्यत मैदानावर खा रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ शहाजी बापू पाटील,माजी दीपक आबा साळुंखे पाटील, भाऊसाहेब रुपनर चेतन केदार यांचे  बैलगाडा  मैदानावर वाजत गाजत हलगीच्या निनादात फटाक्याच्या आतष बाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. ६ जेसीबी मधून पुष्प वर्षाव करण्यात आला. जिप्सी गाडीचे सारथ्य युवा उद्योजक रावसाहेब आलदर यांनी केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!