अहिल्यादेवींचा राज्यकारभार राजकारणासाठी मार्गदर्शक- डॉ.बाबासाहेब देशमुख

सांगोला(प्रतिनिधी):-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यासह सर्व राष्ट्रपुरुषांनी समाजाच्या हितासाठी स्वतःचा विचार न करता अविरत काम केले आहे. थोर राष्ट्रपुरुषांच्या आचारावरती व विचारावरती आपला देश, राज्य व गाव वाटचाल करीत-करीत आपण सर्वांगीण विकास साधत आहोत.राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाभिमुख राज्यकारभार करून जनतेला सुखी आणि समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा राज्यकारभार माझ्या सारख्या राजकारणातील नवख्या व तरुणांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असे विश्वास डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केला.
राजमाता अहिल्यादेवी यांच्या कार्यकाळातील अशा अनेक गोष्टीं त्यांनी पुढील अनेक वर्षांचा विचार करुन केल्या आहेत.ते आदर्श काम डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी काम केले तर ते काम नक्कीच आदर्शवत होईल.आज आपण राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना अनेक गोष्टी अनुभवतो विशेषता राजकारणामध्ये तर सध्या अमुलाग्र बदल पहावयास मिळत आहे.. सत्ता मिळवण्यासाठी अनेक उपाय वापरले जात आहेत सत्तेतुन पैसा.त्या पैशातून सत्ता मिळवण्याचे प्रकार पहावयास मिळत आहेत.राजमातेच्या कार्यकाळात सत्ता ही जनतेसाठी जनतेच्या हितासाठी असायची.स्वतासाठी व आपल्या कुटुंबाच्या हितासाठी नव्हती.अशा गोष्टी सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून काम केले तर ते काम नक्कीच आदर्शवत होईल.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व समावेशक चर्चा करुन, सल्ला मसलत करुन, त्या त्या क्षेत्रात निपुण असणार्यांशी चर्चा करुन राज्यकारभार चालवला होता.. विविध घटकांना विचारात घेऊन त्या निर्णय घेत असत कित्येक निर्णय तर विरोध झुगारुन घेतले गेले त्या निर्णयांमध्ये गोरगरीबांच्या हित आसायचे..हाच आचार व विचार जर का आपण सर्वांनी अंमलात आणला तर नक्कीच आदर्शवत अशी राज्य सत्ता निर्माण होईल.
आजमितीला सर्व पक्षातील नेत्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा अभ्यास करुन त्या़च्या आदर्शावरती पाऊल टाकुन काही कठोर निर्णय घेतले तरी. अनेक अबला महिलांना न्याय मिळुन जाईल..आणि असा न्याय मिळालाच पाहिजे तसे ते लोकशाहिला अभिप्रेत आहे असे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.