“अस्तित्व”तर्फे मासिक पाळी स्वच्छ्ता दिवसानिमित्त किशोरवयीन मुलींचा मेळावा संपन्न.

मुलींनी अभ्यासाबरोबर स्वतःच्या आरोग्याची पण काळजी घेण्याची नितांत गरज असून विशेषतः मासिक पाळीच्या काळात अधिक दक्ष राहिले पाहिजे असे प्रतिपादन बालरोग तज्ञ डॉ संगीता पिसे यांनी व्यक्त केले. “अस्तित्व” संस्थेच्या वतीने काल जागतिक मासिक पाळी स्वच्छ्ता दिवसानिमित्त किशोरवयीन मुलींचा मेळावा आयोजित केला होता त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्या पूढे म्हणाल्या की, मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, मोबाईल चा अती वापर करणे टाळून स्वतःच्या करियर कडे जास्त लक्ष दिलें पाहिजे. मासिक पाळीच्या तक्रारीबाबत घरी आई, बहीण किंवा मैत्रिणी यांच्याशी निसंकोच पणे बोलले पाहिजे. मासिक पाळीच्या काळात सकस आहार, विश्रांती घेतली पाहिजे. रूढी, परंपरा, अंधश्रधा, उपवास यापासून आलिप्त राहुन वैज्ञानिक दृष्टीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. असे मत डॉ. सौ. पिसे यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ.दुधाळ मॅडम आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाल्या की, मुलींनी स्व-स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष दिलें पाहिजे. मुलींच्या जीवनातील मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिच्याशी अंधश्रध्देशी कधीही संबंध लावू नका. मुलींनी उपवास वगैरे न करता स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घेतली पाहिजे. मासिक पाळीत नियमित काहीं अडचणी, त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. असे डॉक्टर दुधाळ मॅडम म्हणाल्या. यावेळी मुलींच्या अनेक प्रश्नांना डॉक्टर दुधाळ व डॉक्टर पिसे मॅडम यांनी सविस्तर उत्तरे दीली. अस्तित्व संस्थेच्या वतीने अशा प्रकारचा कार्यक्रम कार्यक्रम घेऊन आमच्या आरोग्याबाबतच्या समस्यांवर चर्चा घडउन आणल्या. बदल संस्थेचे अनेक मुलींनी कौतुक केले.
यावेळी संस्थेच्या प्रकल्प समन्वयक दीपाली भुसनर यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले त्यांनी प्रास्ताविकात सांगितले की 28 मे हा जागतिक मासिक पाळी स्वच्छ्ता दीन म्हणून पाळला जातो. 2014 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकारातून हा दिवस साजरा करण्याची सुरूवात झाली त्याचे औचित्य साधून आम्ही 29 मे रोजी हा कार्यक्रम घेत आहोत. मासिक पाळी संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने चर्चा झाली पाहिजे, मासिक पाळीच्या मुलींच्या तक्रारी समजून घेता याव्यात, मासिक पाळी बद्दल असणारा समाजातील संकोच कमी व्हावा यासाठीच हा मेळावा आयोजित केला होता असे दिपाली भुसनर यांनी सांगितले. कार्यक्रमास वाणीचिंचाळे, गोणेवाडी, वाकी, हटकरमंगेवाडी, जुजारपुर,घेरडी, आलेगाव, वाढेगाव येथील बहुसंख्य मुली उपस्थित होत्या.