मेडशिंगी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी

मेडशिंगी (प्रशांत पाटील):-मेडशिंगी तालुका सांगोला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली. मेडशिंगी गावच्या विद्यमान सरपंच सौ उमाताई इंगोले, उपसरपंच अमर गोडसे सर, पोलिस उपनिरीक्षक सौ.कविता रुपनर मॅडम , सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिल भाऊ इंगवले, श्री. जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ. बंडोपंत लवटे, कल्पनाताई शिंगाडे यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सुर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यावेळी कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व फार मोठे आहे, त्या प्रमाणे गावातील प्रत्येक महिलांनी सक्षम बनलं पाहिजे. तसेच गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी म्हणून अकरा हजार रुपयांचा रुखवत सुर्योदय उद्योग समूहाच्या वतीने देण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. तसेच रत्नप्रभू उद्योग समूहाचे चेअरमन व गावचे उपसरपंच अमर गोडसे सर यांनी एक जून ते पाच जून या दरम्यान जन्मलेल्या मुलींच्या नावे प्रत्येकी 11000 रुपयांची ठेव करण्याचे जाहीर केले. यावेळी कल्पना शिंगाडे पोलीस उपनिरीक्षक सौ. कविता रुपनर मॅडम यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तुत्व यावेळी प्रकट केले.
मेडशिंगी ग्रामपंचायतच्या वतीने कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये सामाजिक क्षेत्रात, महिला व बाल क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य, बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहायता बचत गट अशा कार्यामध्ये काम करणार्या अनुक्रमे सौ. स्वाती आनंदा काळे, सौ.निर्मला दिलीप शिंदे, श्रीमती कल्पनाताई प्रकाश शिंगाडे,सौ. मीनाक्षी तुकाराम कांबळे,सौ. दिपाली विलास गाडेकर यांना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी मेडशिंगी, बुरलेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रवीण पाटील व प्रस्तावना गडहिरे गुरुजी यांनी केले.
लक्षवेधी:-
1) सूर्योदय उद्योग समूहाच्या वतीने प्रत्येक लेकीच्या लग्नाकरिता 11000 रुपयांचा रुखवत
2) रत्नप्रभू उद्योग समूहाच्या वतीने 1 जून ते 5 जून जन्मास आलेल्या मुलींच्या नावे प्रत्येकी 11 हजार रुपयांची ठेव.
3) ग्रामपंचायत च्या वतीने 5 कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार प्रदान
4) सूर्योदय उद्योग समूहाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुस्तकांचे मोफत वितरण