सांगोला विद्यामंदिर, सांगोला प्राचार्यपदी प्रा.गंगाधर घोंगडे यांची निवड

सांगोला (प्रतिनिधी ) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला प्राचार्य लक्ष्मण जांगळे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले त्या रिक्त झालेल्या पदावर सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे उपमुख्याध्यापक प्रा.गंगाधर घोंगडे यांची निवड झाली.त्यांनी १ जून १९९० रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथून सहशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर नाझरा विद्यामंदिर नाझरा येथे ज्युनिअर कॉलेजकडे २२ वर्षे मराठी व इतिहास विषयाच्या अध्यापनातून व इतर शैक्षणिक कार्यातून वेगळा ठसा उमटवला त्यामुळेच सोलापूर जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारासह विविध संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या १२ पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला.नंतर सेवा ज्येष्ठतेनुसार तीन वर्ष उपप्राचार्य म्हणून सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे उत्तम सेवा बजावली. व त्यानंतर पदोन्नतीवर उपमुख्याध्यापक म्हणून यशस्वीपणे काम पाहिले.
नूतन प्राचार्य घोंगडे यांनी मावळते प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांच्या हस्ते पदभार घेतला. यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थासचिव म.शं.घोंगडे,कोळा विद्यामंदिरचे प्राचार्य नारायण विसापूरे, नाझरा विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड, सांगोला विद्यामंदिरचे पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या निमित्ताने सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष म.वी.घोंगडे, सचिव म.शं.घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत,संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, उपप्राचार्य प्रा.लक्ष्मण विधाते, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने,शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नूतन प्राचार्य गंगाधर घोंगडे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..
कै.गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांचे विचार व तत्व याला प्रमाण मानून शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालामध्ये मी सन १९९० मध्ये सहशिक्षक म्हणून रुजू झालो. शाळा उपक्रमशील असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या उपक्रमामध्ये शिक्षक पदावर असताना कार्य करता आले. नाझरा विद्यामंदिर ज्यु. कॉलेजमध्ये करिअर गायडन्स विभागाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आले. आज माझे अनेक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी व विविध पदावर विराजमान आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे. उपप्राचार्य,उपमुख्याध्यापक पदावरून आज मी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला आहे. यापुढेही संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं. घोंगडे सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके व सर्व संस्थाकार्यकारणी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्यपदी कार्य करताना विद्यार्थ्यांचा गुणात्मक व रचनात्मक विकासाबरोबरच शाळेच्या उन्नतीसाठी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असणार आहे..
*प्रा.गंगाधर घोंगडे*
*नूतन प्राचार्य सांगोला विद्यामंदिर*