सांगोला विद्यामंदिरचा एस.एस.सी.परीक्षेमध्ये दबदबा
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी एस.एस.सी.मार्च परीक्षा 2023 सांगोला विद्यामंदिरने सुयश प्राप्त केले.
सांगोला विद्यामंदिर प्रशालेने दरवर्षीप्रमाणे इ. दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखत प्रशालेत कुमार हर्षराज शामराव जगताप 99.20% गुण प्राप्त करून तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला ,द्वितीय क्रमांक विभागून साक्षी लक्ष्मण माने 98.40% व सानिका तानाजी पाटील 98.40% तर तृतीय क्रमांक देखील विभागून आर्या अनिल नवले 98.20% व विद्या शंकर घुणे 98.20% असे गुण मिळवले आहेत.95 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी संख्या 25 तर 90% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी संख्या 66 तसेच विशेष श्रेणीमधील विद्यार्थी 229, प्रथम श्रेणीमधील विद्यार्थी 147, द्वितीय श्रेणीतील विद्यार्थी 83 ,उत्तीर्ण श्रेणी तील विद्यार्थी 16, तसेच मराठी विषयांमध्ये 98 गुण मिळवणारे दोन विद्यार्थी, संस्कृत विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवणारे 11 विद्यार्थी,
तसेच गणित या विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळणारे चार विद्यार्थी आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष म.वि.घोंगडे, संस्था सचिव म.शं. घोंगडे, सहसचिव प्रशुध्दचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके ,प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपप्राचार्य लक्ष्मण विधाते,पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने, प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.