नाझरा विद्यामंदिर चा दहावीचा निकाल 100%; गणित विषयात 99 गुण मिळवून गौरी गोडसे बोर्डात द्वितीय
नाझरा(वार्ताहर):- मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.यावर्षी प्रशालेतून 125 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते 125 पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. गुणानुक्रमे सेमी माध्यमचे प्रशालेतील प्रथम तीन विद्यार्थी खालील प्रमाणे प्रथम क्रमांक-कुमारी गोडसे गौरी वसंत-96.80%, द्वितीय क्रमांक कुमारी भंडगे साक्षी समाधान 92.40% , तृतीय क्रमांक विभागून कुमारी बंडगर प्रतीक्षा रावसाहेब 91.40% व कुमारी चौगुले सानिका महेश 91.40%, मराठी माध्यमाचे प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक कुमारी वाघमोडे पुनम चंद्रकांत 92.80%, द्वितीय क्रमांक व्हनमाने आरती तानाजी 84.80 व तृतीय क्रमांक कुमारी आदाटे शुभांगी दत्तात्रय 83.20%
त्याचबरोबर 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नऊ आहे.सदर विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, मुख्याध्यापक अमोल गायकवाड पर्यवेक्षक मधुकर धायगुडे व सर्व पालकांनी अभिनंदन केले.