political

माढा लोकसभा मतदार संघात जलसिंचन योजनांचा वर्षाव

दि. 2 जून 2023 वार शुक्रवार रोजी सिंचन भवन पुणे येथे माढा लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील प्रलंबीत तथा कामे सुरू होण्याच्या स्थितीत असणाऱ्या सर्व जलसिंचन प्रकल्पाबाबत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मागणी वरून आढावा बैठक आयोजीत करणेत आली होती. मा. श्री. कपोले, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस निमंत्रीत विधानसभा सदस्यांपैकी आ. जयकुमार गोरे, आ. शहाजीबापू पाटील, आ. संजयमामा शिंदे, आ. दिपक चव्हाण, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सह तालुकाध्यक्ष करमाळा गणेशजी चिवटे, तालुकाध्यक्ष सांगोला चेतनसिंह केदार, मा. के के. पाटील, बाळासाहेब सरगर, सोपानकाका नारनवर, माळशिरस, दत्तात्रय मोरे. माढा आदी मान्यवर व मुख्य अभियंता म.कृ.वि.म. तसेच विविध प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता कार्यकारी अभियंता असे अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदार संघातील तीस जलसिंचन प्रकल्पाच्या कामांची सूची अजेंठ्यावर घेतली होती. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदार संघातील जलसिंचन प्रकल्पाच्या विषयांवर त्या त्या लोकप्रतिनिधींनी आपापली बाजू मांडत ते प्रकल्प लवकरात लवकर कसे पूर्ण होतील त्यासाठी करावी लागणारी कार्यवाही व तरतूदी विषयी सूचना मांडल्या. यावर अधिकाऱ्यांनी त्या प्रकल्पाची सद्यस्थिती, शासकीय मान्यता तरतूदी विषयी माहिती दिली व हे प्रकल्प लवकरात लवकर कसे मार्गी लागतील या करिता कराव्या लागणा-या पुढील शासकीय कार्यवाहीची जबाबदारी कार्यकारी संचालक यांनी घेतली. या पुढील सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
1. गेले तीन वर्ष सातत्याने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर पाठपुरावा करत असलेल्या निरा-देवघरच्या लाभक्षेत्रातील वितरण नलिकेच्या किमी ६५ ते किमी ८७ पर्यंतचे कामाच्या निविदा येत्या १५ दिवसात प्रसिद्ध होवून लवकरच कामाला सुरुवात होईल, निरा-देवघरच्या ५०० कोटींच्या कामांना पुढील एक महिण्यात सुरुवात होत असून यामध्ये माळशिरस पर्यंतचे पाणी वितरण नलिकेचे काम पुर्ण होणार आहे. याबरोबरच माळशिरस तालुक्यातील लाभक्षेत्रापासून वंचीत असलेल्या गावांचा १२ समावेशही लवकरच होणार आहे. नव्याने लाभक्षेत्रात समावेश झालेल्या पंढरपूर व सांगोला तालुक्याच्या पाणी वाटपाचा आराखडा तयार करणेच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी राष्ट्रवादीचे आ. दीपक चव्हाण यांनी फलटण तालुक्यातील बंधारे, पाझर तलाव भरून तालुक्यास अपेक्षित असणारे पाणी तालुक्यास देवून मगच पाणी खाली इतर तालुक्यास देण्यात यावे अशी सूचना मांडली. यावर तालुक्याचे हक्काचे पाणी तालुक्यास मिळणारच आहे. या व्यतिरिक्त अतिरिक्त पाण्यातूनही ०.९३ TMC पाणी धोम बलकवडीतून फलटण तालुक्यास मिळणार असलेची अधिकृत माहिती आधीका-यांनी दिली
2. सोळशी व शिवथरघळ येथून निरा-देवघर धरणात तथा माण, फलटण सांगोला या तालुक्यांना पाणी उपलब्ध करून देणे बाबत झालेला ड्रोन सर्व बाबत आढावा घेणेत आला याबाबत प्रशासकीय अहवाल तथा अभिप्राय लवकरात लवकर देणे बाबत सूचना करणेत आल्या.
3. धोम-बलकवडी व निरा देवघर कालवा जोड प्रकल्पाचे निविदा पुढील पंधरा दिवसात पूर्ण होवून उतरोली ता. भोर येथे सदर प्रकल्पाच्या कामाची सुरुवात लवकरच होईल. या आशिया खंडातील पहिल्याच कालवा जोड प्रकल्पामुळे धोम-बलकवडी कालव्याचे पाणी चारमाहीचे आठ माही होणार आहे. निरा देवघरचे बंदीस्त पाईप, बाष्पीभवन व ईतर बाबीतून बचत होणाऱ्या ४.१० TMC अतिरिक्त पाण्या मधून ०.९३ TMC पाणी धोम-बलकवडी कालव्यातून लाभक्षेत्रात मिळणार आहे. या बरोबरच या लाभक्षेत्रात कारुंडे व कोथळे या गावांचा समावेश करणेबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना देणेत आल्या व धोम बलकवडी कालव्याची उर्वरीत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्याही सूचना देणेत आल्या.
4. जिहे कटापूर योजनेच्या सुरु असलेल्या कामाबाबत आ. जयकुमार गोरे यांनी आढावा घेत असतानाच लाभक्षेत्रातील पाणी वाटपाचे फेर नियोजन करून ४६ गावांचा समावेश त्यामध्ये करणे बाबतचा प्रस्ताव शासनाकडे कोणत्या टप्यावर आहे त्याबाबत माहिती घेतली तसेच उरमोडी- कोंबडवाडी बंदिस्त वितरण नलिकेचे काम लवकरात लवकर पूर्ण होणेकामी कराव्या लागणान्या कार्यवाहीच्या सूचनाही देणेत आल्या, खासदार निंबाळकरांनी च्या सूचनास अनुमोदन दिले.
5. सांगोला उपसा सिंचन योजनेचे काम लवकरच सुरु होत असून त्याबाबत आ. शहाजीबापू पाटील व खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आढावा घेत, टेंभू प्रकल्पातून मिळणाऱ्या अतिरिक्त २ TMC पाण्याच्या नियोजनाबाबत सूचना केल्या व त्यातील ०.६ TMC पाणी वर्षातून दोन वेळा माण नदीत सोडून तालुक्यातील बंधारे भरून घेण्यात यावेत व कोरडा आणि अप्रूका नदीत पाणी सोडण्यात येऊन बंधारे भरून देणे बाबत नियोजन करण्यास सांगितले. तसेच तिसंगी, सोनके, बुद्देहाळ, चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरणे कामी नियोजन करण्यात यावे व माण नदीवर पाच नवीन बॅरेज बांधणे कामी प्रस्ताव शासन स्तरावर मान्यतेसाठी लवकरात लवकर वाढवण्याच्या सूचना करणेत आल्या. याबरोबरच सांगोला तालुक्यातील सिंचनापासून वंचित असणाऱ्या गावांचा समावेश म्हैसाळ योजनेत करणेबाबतचा प्रस्ताव तातडीने शासन मान्यतेसाठी पाठविण्याच्या सूचना कारण्यात आल्या.
6. माढा तालुक्यातील तुळशी बावी व मानेगाव खैराव योजनेस तत्वतः मान्यता मिळालेनंतर केलेल्या पुढील कार्यवाहीचा आढावा खा. निंबाळकर यांनी घेतला व शासन स्तरावर लवकरच मान्यता मिळून पुढील तीन वर्षात या योजनेची कामे पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला.
7. करमाळा तालुक्यातील मांगेवाडी तलावाचा समावेश कुकडी प्रकल्पात करणेत यावा. तसा प्रस्ताव लवकरात लवकर शासनास मंजूरीसाठी सादर करणेत यावा, या बरोबरच रिटेवाडी तून उजनी व उजनी तून पोंदवडीत घेऊन पश्चिम करमाळ्यातील कायम दुष्काळी भागास देणेत यावे व गोदावरी मराठवाडा प्रकल्पातील जेऊर बोगद्यातील अर्था TMC पाणी उपसा सिंचन पद्धतीने जवळच्या वंचीत भागांना मिळणेबाबतचा प्रस्ताव शासन मंजूरीस पाठवण्यात यावा अशा सूचना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. संजयमामा शिंदे यांनी मोडल्या या बरोबरच वसना-वांगना प्रकल्पातून उत्तर कोरेगाव तालुक्यातील गावांना लाभ मिळणेबाबत च्या प्रस्तावाचा आढावा घेणेत आला.
या सर्व प्रकल्पांच्या शासन मान्यतेसाठी व मंजूरी मिळालेल्या कामांना निधी उपलब्ध करून दिले बद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानून उर्वरीत प्रकल्पांना शासन मान्यता मिळणेबाबत लवकरच आज उपस्थित असणारे शिष्टमंडळ घेऊन मंत्रालयात बैठक लावणार असलेचे प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. याबरोबरच कृष्णा-भीमा स्थैर्यीकरण व ईतर छोट्या मोठ्या प्रकल्पाची कामे आगामी तीन वर्षात मार्गी लागतील अशी खात्री तथा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!