गौरी स्वामी व सुशीला खरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

घेरडी (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून ३१ मे रोजी वाणीचिंचाळे ग्रामपंचायतीमध्ये सौ. गौरी स्वामी व सुशीला खरात यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वाणीचिंचाळे व परिसरातील महिलांना संघटित करून महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेता महिलांना बळ देण्यासाठी व महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला बचत गटाची स्थापना करून महिला बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना आर्थिक बाजूने मजबूत करणाऱ्या सौ.गौरी चिदानंद स्वामी यांना तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सुशीला जालींदर खरात यांना सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिला व बाल विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सन २०२३ – २४ चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने वाणीचिंचाळे ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ.प्रियंका गडहिरे , उपसरपंच लक्ष्मी घुणे , ग्रामसेवक श्री.सुनिल साळुंखे ,ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.