नातेपुते येथे एस टी विभागाच्या वतीने अमृतमहोत्सव साजरा –
(सुनिल ढोबळे) पुणे ते नगर अशी पहिली बससेवा १जुन १९४८ साली सुरू करण्यात आली त्या निमित्ताने एस टी विभागाच्या वतीने ७५ वा वर्धापणदिन साजरा करण्यात आला.आलेल्या मान्यवरांचे व पत्रकारांचे आणि प्रवासी नागरिकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
प्रस्ताविक वलेकर सर यांनी केले.वाहतुक नियंत्रक कर्तव्यदक्ष अधिकारी बाळकृष्ण नाईकनवरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी ७५ वर्षामध्ये प्रवाशांनसाठी सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांनसाठी ६५ वर्षापर्यंत हाफ तिकिट व अपंग व्यक्तीसाठी वन फोर तिकीट आणि शालेय विद्यार्थ्यांनी यांच्यासाठी इ ५ वी ते इ १२ वी पर्यंत अहिल्यादेवी होळकर या नावाने त्यांना मोफत प्रवास आहे.सध्या चालु वर्षामध्ये सरकारने ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ७५ आहे अशांना मोफत प्रवास व महिलांनसाठी हाफ तिकीट लागु केले आहे.अशा विविध प्रकारच्या योजना एस टी महामंडळाने चालू केल्या आहेत प्रवाशांना त्यांनी आव्हान केले की नागरिकांनी एस टी ने च प्रवास करावा.तसेच ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बावीसकर(बापू),पोतदार सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रमास वाहतुक नियंत्रक अधिकारी प्रताप रेवंडे साहेब,सुशिल काळे,पोपट साळवे,रमजान बागवान,बोडरे गुरुजी ,बबन साळवे,सोपान लांडगे,सतिश बडवे,प्रकाश साळवे,अमोल बरडकर,सविता खरात,अकलुज आगाराचे चालक बी एम ढगे,वाहक एस व्ही बुधावले,प्रवासी नागरिक -गोवींद भोसले,मेजर खिलारे,संगीता झेंडे,कांताबाई कर्णे,विद्यार्थ्यांनी प्रवासी-प्राची पाटोळे,भुमी भोसले.इ उपस्थित होते .आभार पोतदार सर यांनी मानले.