उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयामध्ये इयत्ता दहावीतील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न…
![](https://mandootexpress.com/wp-content/uploads/2023/06/WhatsApp-Image-2023-06-03-at-8.21.29-PM-780x470.jpeg)
एसएससी बोर्ड मार्च 2023 परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. उत्कर्ष विद्यालयाने शंभर टक्के निकालाचा षटकार मारत यशाची परंपरा कायम राखली. या परीक्षेत 58 पैकी 52 तर विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन मिळवले. तसेच 28 विद्यार्थ्यानी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले. विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी-
1. फुले प्रतीक्षा विकास =97.00%
2. पैलवान मधुरा भारत = 96.60%
3. मुजावर शाहिद जमीर=95.80%
3. भंडारी तनिष्का विकास=95.80%
4. बंडगर मीरा पंढरीनाथ=95.40%
5. शिनगारे श्वेता गणेश=94.60%
वरील सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा शाळेच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक मिसाळ सर यांनी केले तर शिक्षिका भोसले मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.