सांगोला येथे संजय राऊत यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन संपन्न
सांगोला -शिवसेना शिंदे गटाचे खा. श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच खा संजय राऊत हे थुंकले व प्रसारमाध्यमांबाबत बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सांगोला तालुका शिवसेना, युवा सेना , शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील विचार मंच यांच्यावतीने काल सांगोला येथील वासूद चौकात खा. संजय राऊत यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मार आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी ‘अरे या संजय रावताचे करायचे काय खाली मुंडके वर पाय.. धिक्कार… असो धिक्कार… असो संजय रावताचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन रावताचा निषेध व्यक्त केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे युवा सेना तालुकाप्रमुख गुंडा दादा खटकाळे, माजी नगरसेवक सोमेश यावलकर,उद्योगपती अभिजीत नलवडे, संजय मेटकरी, बाळासाहेब आसबे,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, पांडुरंग मिसाळ, अजिंक्य शिंदे , संजय गव्हाणे, धीरज पवार, सचिन काळे, पप्पू इंगोले, दीपक दिघे ,दीपक पवार ,आदित्य नागणे ,अजय सुरवसे ,अक्षय पवार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.