बाळासाहेब देसाई विद्यालय चा दहावीचा निकाल शंभर टक्के
नाझरा(वार्ताहार):- मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विकास एज्युकेशन सोसायटी संचलित बाळासाहेब देसाई विद्यालय चोपडी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे.
परीक्षेसाठी 68 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला. आहे 90% पेक्षा अधिक गुण मिळवणारे तीन विद्यार्थी आहेत तर विशेष श्रेणीमध्ये 29 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे.सेमी माध्यम मधून प्रथम क्रमांक कुमारी खंडागळे सानिका दुर्योधन 93.40% ,द्वितीय क्रमांक कुमारी बाबर तनुजा पोपट 91.80% तृतीय क्रमांक बाबर प्रगती राजाराम 91.40% तर मराठी माध्यमातून कुमारी पाटील श्रुतिका बापू 84.60%, द्वितीय क्रमांक पारेकर तृप्ती नामदेव 84.00% व तृतीय क्रमांक कुमारी भोसले धनश्री दिगंबर 81.40% .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे घरी जाऊन प्राचार्य केशव बाबर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.विद्यालयाच्या या यशाबद्दल विकास एज्युकेशन सोसायटी चे विद्यमान अध्यक्ष डॉ. आनंदराव बाबर, मुख्याध्यापक के.डी. बाबर,सर्व ग्रामस्थ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.