सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये इ. 10 वी. विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ संपन्न

सांगोला:- मंगळवार दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वा. सांगोला विद्यामंदिर प्रशाला व जुनिअर कॉलेज येथे इ.10 वी. विद्यार्थ्यांचा बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा समारंभ अतिशय आनंदी व उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.
पर्यवेक्षक श्री बिभीषण माने सर यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असे विचार आपल्या प्रास्ताविकामध्ये मांडले. या वेळी व्यासपीठावरती संस्था सचिव माननीय म. शं. घोंगडे, उपमुख्याध्यापक माननीय लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य माननीय सौ सय्यद मॅडम, पर्यवेक्षक माननीय पोपट केदार, माननीय अजय बारबोले उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.  विद्यार्थी मनोगता मधून कुमारी साक्षी बंडगर,कुमारी साक्षी शेटे, कुमारी समृद्धी भातुंगडे, कुमार अमर चोरमुले, कुमार आदित्य भोसले इत्यादी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देण्याबरोबरच शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला तसेच शाळेमध्ये गुणवत्ता वाढीसाठी केले जात असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य श्री गंगाधर घोंगडे यांनी कन्नड व संस्कृत मधील अनेक श्लोकांचा दाखला देऊन विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण ज्या क्षेत्रामध्ये वाटचाल कराल त्या क्षेत्रातील विद्वान झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये यश संपादन करून आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक उल्हास यादव सर यांनी इयत्ता 11 वी. MHT-CET याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शिक्षकांमधून श्री उन्मेष आटपाडीकर सर यांनी भाषा विषय तोंडी परीक्षा,सौ.शुभांगी घोंगडे मॅडम यांनी विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा, श्री उत्तम सरगर सर यांनी गणित प्रात्यक्षिक परीक्षा, श्री मारुती बोरकर सर यांनी टेक्निकल प्रात्यक्षिक परीक्षा तसेच श्री नामदेव खंडागळे सर यांनी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने बारकोड स्टिकर,  रिसीट इ.बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थाअध्यक्ष माननीय प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,संस्थासहसचिव माननीय प्रशुद्धचंद्र झपके साहेब, कार्यकारिणी सदस्य माननीय विश्वेश झपके यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री प्रशांत रायपुरे सर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी इयत्ता दहावीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!