सांगोला तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी शहाजीराव इंगोले तर सचिवपदी बाळासाहेब शिंदे
सांगोला (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन ई 136 सांगोला तालुका ग्रामसेवक संघटनेच्या नूतन पदाधिकारी निवडीसंदर्भात काल रविवार दि.4 जून रोजी पंचायत समिती, सांगोला येथे बैठक संपन्न झाली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पठाण यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी अध्यक्षपदी श्री.शहाजीराव महादेव इंगोले यांची तर सचिवपदी श्री बाळासाहेब गंगाराम शिंदे यांची सलग तिसर्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी श्री.शंकर राजाराम मोहित व श्रीमती मनिषा गणपत जावीर यांची कार्याध्यक्षपदी श्री.मंगेश मोहन पोरे, सीसचिवपदी श्री समाधान शंकर आदाटे, कोषाध्यक्षपदी श्री.नितीन महादेव गडदे आणि संघटकपदी श्री.शमिरखान मोहिद्दिन पठाण आणि महिला संघटक श्रीम.सुबाबाई विष्णू गवंड यांची निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकार्यांचे विभागीय उपाध्यक्ष बाबासाहेब कापसे, जिल्हा अध्यक्ष शरद भुजबळ, कार्याध्यक्ष श्री.ढवळे यांनी अभिनंदन केले.
सदरची निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी राजकुमार ताटे, शंकर मेटकरी, बिभीषण सावंत, खानसाहेब मुलाणी, आत्माराम कोळी, सदाशिव मागाडे, दादासोा आडसूळ यांनी विशेष प्रयत्न केले.