चोपडी येथे भिकाजी बाबर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार संपन्न.
भिकाजी बाबर यांची कार्यतत्परता हीच आजच्या युवकांसाठी स्फूर्तीचा झरा आहे- आमदार शहाजी बापू पाटील
वयाच्या 75 व्या वर्षी युवकांना लाजवेल असा प्रचंड उत्साह, सामाजिक,राजकीय काम करण्याची प्रचंड ओढ आणि माणूस जोडण्याची अप्रतिम कला यातूनच चोपडीचे सुपुत्र भिकाजी बाबर हे सांगोला तालुक्यात एक सच्चा कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मिळत गेली आहे, भिकाजी बाबर यांची कार्य तत्परता हीच आजच्या युवकांसाठी स्फूर्तीचा झरा असल्याचे प्रतिपादन सांगोला विधानसभेचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले.चोपडी येथे भिकाजी नारायण बाबर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सोलापूर विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, पुणे येथील उपायुक्त रामचंद्र शिंदे,केंद्रीय आयकर निरीक्षक चंद्रकांत बाबर,विक्रीकर अधिकारी महेश डोंगरे,चोपडी ग्रामपंचायतच्या सरपंच मंगल ताई सरगर, उपसरपंच पोपट यादव,माजी मुख्याध्यापक वाय. एस.बाबर,माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बाबर, भिकाजी बाबर व त्यांच्या सुविद्य पत्नी उपस्थित होत्या. पुढे बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले की कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा हे भिकाजी बाबर यांच्याकडून शिकायला हवं. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यापासून ते अनेक अबालवृद्धांची काम करण्यापर्यंत त्यांनी समाजाची सेवा केली आहे.आज त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने हा प्रचंड जनसमुदाय गोळा झाला आहे हीच त्यांची खरी श्रीमंती आहे. माणूस पैसा किती कमवतो याहीपेक्षा माणसं किती कमवतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे.जगण्यातलं खरं मर्म हे भिकाजी बाबर यांनी शोधल आहे.यावेळी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी भिकाजी बाबर यांच्या पक्षनिष्ठेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या आठवणी ग्रामस्थांसमोर मांडल्या, त्याचबरोबर एक सच्चा कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी काय करू शकतो हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे साहेब यांनी भिकाजी बाबर यांच्यामुळे मी माझ्या जीवनात कशी प्रगती करू शकलो याचा आलेख सर्वांसमोर मांडला. यावेळी केंद्रीय आयकर निरीक्षक चंद्रकांत बाबर यांनी भिकाजी बाबर यांनी केलेल्या कार्यातून मी कसा अधिकारी झालो याबाबत आपले मनोगत व्यक्त करत गावातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीसासाठी 51 हजार रुपयांचा चेक भिकाजी बाबर यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी सतीश पाटील,बाळासाहेब बाबर यांनी आपल्या मनोगतातून भिकाजी बाबर यांचे व्यक्तित्व स्पष्ट केलं.या कार्यक्रमास सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र देशमुख, वाकी शिवणे गावचे लोकनियुक्त सरपंच दादासो घाडगे तुकाराम जाधव, समाधान शिंदे, हिंदुराव घाडगे, शामराव शिंदे,पिंटू शिंदे,महादेव शिंदे समाधान तात्या बाबर, चोपडी पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच,उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन व सर्व सदस्य, अनेक महिला कार्यकर्त्या, पत्रकार उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ व राहुल बाबर यांनी केले तर आभार यशवंत बाबर सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य दिनकर बाबर,सचिन खळगे, बाळासाहेब बाबर (फौजी),बंडू मेखले, मल्हारी मेखले, सुरेश बाबर, उल्हास बाबर, दगडू बाबर, राजू मेखले, साहेबराव बाबर, सुभाष बाबर, दिलीप बाबर गुरुजी, कृष्णदेव बाबर,पितांबर बाबर यांच्यासह अनेक भिकाजी बाबर स्नेह परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
*चौकट करणे*- सत्काराला उत्तर देताना भिकाजी बाबर म्हणाले की आज पर्यंत या चोपडी गावाने मला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आहे अनेक वेळा अडचणीच्या वेळी या गावातील अनेकांनी मला मदतीचा आधार दिला आहे आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने चोपडी परिसरातून आलेले हे सगळे नागरिक पाहून मी भारावून गेलो आहे. इथून पुढे मला कोणी विचारलं की तुमची नक्की कमाई काय ?तर मी त्यांना सांगू शकतो की माझ्या सत्काराला आलेला हा एवढा मोठा जनसमुदाय हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे. अनेक प्रसंगाने मला लढायला शिकवले. केवळ दीपक आबांच्या मार्गदर्शनामुळे व शहाजी बापूंच्या सहकार्यांमुळे मी राजकारणात व्यवस्थितपणे तरू शकलो. गावात सर्वप्रथम गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना सुरू करून अनेकांना प्रोत्साहित केल्यामुळे अनेक अधिकारी या गावात घडल्याने मला प्रचंड समाधान लाभले.