सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिर ज्युनि.कॉलेज मध्ये शै.वर्ष २०२३-२४ इ.११ वी प्रवेश सुरु

मंगळवार दि.२० जून,२०२३ पर्यंत प्रवेश पूर्व अर्ज भरता येणार

सांगोला ( प्रतिनिधी) : सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ इ.११ वी कला,वाणिज्य व शास्त्र शाखेत दिनांक ८ जून,२०२३ पासून प्रवेश सुरु असल्याची माहिती प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी दिली.सदर वर्गात इ.१० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल.
यामध्ये दि.८ जून,२०२३ पासून दि.२० जून,२०२३ पर्यंत प्रवेश पूर्व अर्ज विक्री तर दि.२० जून,२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रवेश पूर्व अर्ज सादर करता येईल.
पहिली गुणवत्ता यादी दि.२६ जून २०२३ रोजी प्रसिद्ध केली जाईल.पहिल्या गुणवत्ता यादीत गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे (उदा.इ.१० वी गुणपत्रक, झेरॉक्स प्रत,मूळ शाळा सोडल्याचा दाखला (L.C.), झेरॉक्स प्रत,जातप्रमाणपत्र झेरॉक्स प्रत,आधारकार्ड झेरॉक्स व आयडेंटी साईज २ फोटो इ.) दि.१ जुलै २०२३ पूर्वी प्रवेश घ्यावयाचा आहे.प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्व अर्ज भरून देणे अनिवार्य आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी कला शाखा प्रा. शिवशंकर तटाळे ( मो.९४२०३०७५९०), वाणिज्य शाखा प्रा.राजेंद्र कुंभार ( मो.९८८१५२७४२७) तर शास्त्र शाखेतील प्रवेशासाठी प्रा.दिलीप मस्के (मो.९४०४६५०४६६), प्रा. जालिंदर मिसाळ ( मो.९९७५४९११३२) यांचेशी संपर्क साधावा.

संस्थापक अध्यक्ष गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांचे विचार प्रमाण मानून सांगोला विद्यामंदिरने विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व रचनात्मक विकासाला नेहमी प्राधान्य दिले आहे.त्यामुळेच सांगोला विद्यामंदिर गुणवत्तेत अग्रेसर राहिले आहे. यानुसार
शास्त्र शाखेमध्ये अधिक गुणवत्तेसाठी २०० गुणाच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाची सोय केली आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चालू शैक्षणिक वर्षापासून सांगोला बस स्थानक ते प्रशालेपर्यंत मोफत बस सेवा दिली जाणार आहे.
– उपप्राचार्य लक्ष्मण विधाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!