सांगोला तालुका

२५३ सांगोला विधानसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ च्या निवडणूक प्रमुखपदी भाजपचे चेतनसिंह केदार -सावंत , सांगोल्यात भाजपात उस्ताह संचारला

सांगोला  आगामी २०२४ मध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  सांगोला २५३ विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांची  निवडणूक प्रमुख पदी  निवड केली आहे. पक्षाने त्यांच्यावर नव्याने आणखी एक जबाबदारी सोपवल्याने त्यांच्या निवडीचे सांगोला शहर व तालुका भाजपच्या वतीने स्वागत होत आहे.

राज्यातील २८८  विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख प्रमुखांची यादी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी जाहीर केली आहे. या यादीत भाजप नेतृत्वाने चेतनसिंह केदार यांच्यावर  सांगोला विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. चेतन सिंह केदार यांनी भाजप तालुकाध्यक्ष पदाची सांगोला तालुक्याची सुत्रे हाती घेतल्यापासून तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेतेमंडळी, पदाधिकारी, सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन  सांगोला तालुक्यात  प्रभावीपणे बूथ रचना केली. तळागाळापर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचवण्याचे काम रात्रंदिवस सुरु आहे. त्यांची पक्षावर असलेली निष्ठा , सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत, संघटन कौशल्य व आजवर केलेल्या कामाची  कामाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळींनी  चेतनसिंह केदार यांची सांगोला २५३ विधानसभा प्रमुखपदी निवड केली. चेतन सिंह केदार यांच्या निवडीमुळे सांगोला तालुक्यात भारतीय जनता पार्टीला आयतेच बळ मिळाले आहे. त्यामुळे त्यांची आता जबाबदारी वाढली आहे.
  महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने  नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत आणि त्या मी निष्ठेने प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. जुन्या नव्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तालुकाध्यक्ष पदावर काम करीत असताना पार्टीने सांगोला विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून नवीन आणखी एक जबाबदारी देवून माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो आगामी २०२४ ला सांगोला विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजप – शिवसेनेचा झेंडा फडकाववून सार्थ ठरविणार  – चेतनसिंह केदार  तालुकाध्यक्ष ,भाजपा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!