पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उज्जल भारताचे स्वप्न साकार केले :- चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी @ ९ विशेष जनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने सर्व सामान्य जनता शेतकरी केंद्र बिंदू मानून राबविलेल्या विविध विकास कामांच्या योजना व सांगोला तालुक्यात आजपर्यंत विविध विकास कामासाठी मिळालेल्या निधीची इथंभूत माहिती जनतेला मिळावी या उद्देशाने पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याचे सांगोला विधानसभा प्रमुख तथा तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार – सावंत यांनी सांगितले
केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगोला तालुक्यात शेती व पिण्याच्या पाण्याच्या टेभू म्हैशाळ पाणी पुरवठा, नीरा देवधर पाणी पुरवठा, उजनी धरणातून २ टी एम सी पाणी शेतीला,तसेच सोलापूर –सांगली महामार्ग, पंढरपूर सांगोला,सांगोला जत व आता नव्याने सांगोला महूद महा मार्गाच्या बांधणीसाठी करोडो रुपयाचा निधी उपलब्ध केला, त्या बरोबर ग्रामीण भागातील जनतेला पायाभूत सुविधा मिळाव्यात या दृष्टीने पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सांगोला तालूक्यातील रस्त्यांसाठी निधी, सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये व शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेतून गोरगरीब निराधाराना पक्के घरकुलांची पूर्तता, प्रत्येक गावामध्ये उज्वल महिला गॅस योजनेतून मोफत गॅस कनेक्शन , तालुक्यतील प्रत्येक ग्रामपंचायती जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा, अन्न धान्य योजनेतून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मोफत रेशन चालू आहे. पंतप्रधान किसान योजनेतून शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये प्रमाणे प्रती वर्षी ६००० रुपये अनुदान दिले जात आहे, प्रधानमंत्री जन धन योजनेतून राष्ट्रीयकृत बँकातून मोफत खाते उघडले आहेत , कोरोन महामारीच्या काळात तालुक्यामध्ये मोफत लसीकरानाचा लाभ मिळवून दिला, तालुक्यातील ग्रामपंचायतीना इंटरनेट सुविधा, स्वच्छ भारत मोहीम अंतर्गत हर घर शौचालय बांधून लाभ दिला ,
केंद्र सरकारने देशात केलेल्या जनकल्याणकारी योजनाची अंमलबजावणी
स्वच्छ भारत मोहीम अंतर्गत ११.७२ कोटी शैचालाय बांधण्यात आली, उज्वल महिला गॅस योजनेतून ४.६ कोटी मोफत गॅस कनेक्शन देण्यात आली,जन आरोग्य योजनेतून ४.४४ कोटी नागरिकावर उपचार, प्रधान मंत्री आवास योजनेतून ३५ कोटी पेक्षा जास्त परिवारांना पक्के घर मिळाले, अन्न धन्य योजनेतून ८० कोटी जनतेला मोफत रेशन आजही चालू आहे, पंतप्रधान किसान योजनेतून ९९ कोटी शेतकरी बंधू भगिनींना प्रती वर्षी ६००० रुपये दिले, ३७० कलम रद्द , भव्य राम मंदिर बांधले,घर घर नळ हर घर जल आतापर्यंत ११.६६ कोटी कुटुंबाना पिण्याचे पाणी, कोविड१९ काळात २२० करोड मोफत लसीकरण, महिला सशक्तीकरणासाठी २७ कोटी हून अधिक मुद्रा लोन,९ वर्षामध्ये ३.५३ लाख कि.मी.ग्रामीण रस्ते पूर्ण, ९ वर्षात ७४ वरून १४४ विमान तळाची निर्मिती, कौशल्य विकास योजने अंतर्गत १.३७ कोटीहून अधिक युवकांना प्रशिक्षण, एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाअंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल जगातील सर्वात उंच पुतळा निर्मिती, ५ शहरापासून २० शहरापर्यंत मेट्रो सेवा, १११ जल मार्ग निर्माण केले,अर्थ संकल्प तरतुदीत सुमारे ६ पतीने वाढ ,राष्ट्रीय महामार्ग ९ वर्षात ५३.६८६ किमी नवीन रस्ते, जन औषधी योजना देशभरात स्वस्त औषधाची ९३०० दुकाने उघडली, कोविड १९ काळात मैत्रीच्या माध्यमातून १०० हून अधिक देशात लस पाठवून दिल्याने लोकांचे जीव वाचले
यावेळी तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार – सावंत , प्रदेश कार्यकरणी सदस्य गजानन भाकरे, नागेश जोशी,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर,युवा मोर्चा कोषाध्यक्ष विलास व्हणमने, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रवीण जाणकार, सुरेश बुरांडे, विश्वास कारंडे,विष्णू हिप्परकर मोहन बजबले,श्रावण हिप्परकर, मच्छिन्द्र हिप्परकर उपस्थित होते.