गुडनेस स्पोकन इंग्लिश क्लासचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

दिनांक 9 जून 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली.या कार्यक्रमांमध्ये उन्हाळी बॅच समारोप सिंहगड पब्लिक स्कूल, सांगोला .येथे संपन्न झाला गुडनेस क्लासच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर इंग्लिश मध्ये सादरीकरण करून आलेल्या सर्व पालक वर्गांना थक्क करून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सन्माननीय सांगोल्याचे नूतन झालेले तहसीलदार श्री.संजय खडतरे( साहेब), तसेच सांगोला पोलीस स्टेशनचे ए पी आय श्री. आदिनाथ खरात (साहेब) , श्री अशोक नवले (सिंहगड पब्लिक स्कूल) ,
श्री संजय डोंगरे( बीएसएनएल ऑफिस सुपरटेंड, सोलापूर) , श्री शाहिद पटेल (संस्थापक -महाराष्ट्र लेडीज टेलरिंग अँड फॅशन डिझायनिंग) या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुडनेस स्पोकन इंग्लिश चे संस्थापक श्री.निलेश डोंगरे सर यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,सिल्वर मेडल, गोल्ड मेडल, सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित विद्यार्थी पालकांना इंग्लिश विषयाचे महत्त्व सांगितले. यावेळेस गुडनेस क्लासचे सहशिक्षक श्री सचिन उबाळे सर यांनी कार्यक्रमाची नियोजन व्यवस्थितपणे पार पाडले.सूत्रसंचालन आणि आभार वैशाली जाधव मॅडम यांनी मानले या कार्यक्रमासाठी भरपूर प्रमाणात पालक विद्यार्थी उपस्थित होते.