सांगोला विद्यामंदिरचा योगीराज बनकर MHT- CET परीक्षेत तालुक्यात प्रथम; १२ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त पर्सेंटाइल

सांगोला ( प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलकडून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या MHT- CET परीक्षेचा निकाल काल १२ जून रोजी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा योगीराज बनकर याने ९९.७४ पर्सेटाइल मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला व इतर ११ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त पर्सेटाइल मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये प्रणाली शिंदे ९९.१६, वैष्णवी गायकवाड ९८.०५,श्रेया ढोले ९४.७६,साक्षी देशमुख ९३.३८, चैतन्य नागणे ९३.२४,शिवतेज घाडगे ९३.००, वैष्णवी गायकवाड ९२.०८,संदीप फडतरे ९२.०८, भाग्यश्री वेदपाठक ९१.२६, अमृता पाटील ९१.०९, श्रावणी ताटे ९०.४९ पर्सेंटाइल मिळविले..
या विद्यार्थ्यांना सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील शास्त्र अध्यापकांचे मार्गदर्शन लाभले, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ,सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष म.वि. घोंगडे,सचिव म.शं.घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपप्राचार्य लक्ष्मण विधाते, पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभीषण माने,पोपट केदार, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.