अश्लील व्हीडीओ सोशल मिडीया वर अपलोड केल्या प्रकरणी आरोपीस 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 2,00000 रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई व 25000/- रुपये दंडाची शिक्षा

सांगोला(प्रतिनिधी):- इच्छा नसताना गैरवर्तन व्हीडीओ कॉल द्वारे करून तसेच अश्लील व्हीडीओ तयार करून सदर अश्लील व्हीडीओ हे इस्टाग्राम, टेलीग्राम, रोपसतो व कॉलेजचे गुगल मॅप वर अपलोड करुन  जाणीवपूर्वक बदनामी केले प्रकरणी आरोपीस 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 2,00000 रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई व 25000/- रुपये दंडाची शिक्षा करण्यात आली.
आरोपी सिंग (राहणार- लखना थापा, ता. पटटी जि.तरन तारण राज्य पंजाब)  याने लुडो गेमवर हेतुपूर्वक मैत्री करुन खोटया प्रेमाच्या जाळ्यात ओढून फिर्यादीशी जवळीक साधण्यासाठी वारंवार मोबाईलवर व्हीडीओ कॉल करून अश्लीस चाळे केल्याने व बेकायदेशीरपणे गैरवर्तनुक विषयी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करणेत आला.सदर गुन्हाचा तपास पोलिस निरिक्षक सुहास जगताप व पोना ए. एस मोहोळकर यांनी पूर्ण करून आरोपीविरुध्द मे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारपक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील फिर्यादी, तपासी अंमलदार व सायबर सेल चे पोलीस कॉस्टेबन काकडे यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. एस. आर. महाडिक यांनी जोरदार युक्तीवाद करत सध्या समाजामध्ये शालेय अगर कॉलेज युवतींचा इलेक्ट्नी माध्यमाद्वारे कशा प्रकारे गैरफायदा घेत त्यांनी सामाजिक व त्यास प्रमाणे मानसिक हानी पोहचवून त्यांचे सामाजिक कौटुंबिक आयुष्य कशा प्रकारे उध्दवस्त केले जाते. या विषयी वाच्यता करत प्रस्तुत खटल्यातील महत्वाची बाब ही याच अनुषंगाने असल्याचे मत मांडत तसेच भादवी, माहिती तंत्रज्ञान कायदयामधील तरतुदींच्या अनुषंगाने आरोपीचे वर्तन हे कायदेशीररित्या कशा प्रकारे चुकीचे व बेकायदेशीर आहे हे अभियोग पक्षाने सिध्द केला आहे.
अभियोगपक्षाचा सदरचा युक्तीवाद ग्राहय धरून सांगोला येथील 2 रे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती. के. बी. सोनवणे यानी आरोपीस दोषी धरून  तीन वर्ष सश्रम कारावास तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 मध्ये तीन वर्ष अशी एकूण तीन वर्ष शिक्षा व 25000 हजार रुपये दंडाची व दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा तसेच फिर्यादीस रक्कम रुपये 200000/- नुकसान भरपाई देणेची शिक्षा ठोठावली आहे.
सदर प्रकरणात अभियोगपक्षा तर्फे सहा. सरकारी अभियोक्ता एस. आर. महाडीक, व्ही.जी साळुखे यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोहे कॉ. पिसे व पोका शिंदे यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button