*सांगोला विद्यामंदिरचे विभागीय तायक्वॉदो स्पर्धेत घवघवीत यश*

सांगोला ( प्रतिनिधी ) दिनांक १८ व १९ डिसेंबर २०२३ रोजी तालुका क्रीडा संकुल मंचर जिल्हा पुणे या ठिकाणी झालेल्या विभागीय तायक्वॉदो स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.यामध्ये १९ वर्षे मुले ५९ ते ६३ किलो वजन गटामध्ये रविराज बापू शिंदे इयत्ता १२ वी संयुक्त या खेळाडूने विभागीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला व त्याची दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.तसेच आर्यन बळीराम मोरे १२ वी शास्त्र ७८ किलो वजन गटात विभागीय स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवीत द्वितीय क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे १९ वर्षे मुली ५२ ते ५५ किलो वजन गटामध्ये यामध्ये आरती विनोद बाबर १२ वी शास्त्र हिने विभागीय स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवीत द्वितीय क्रमांक मिळविला.
वरील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा. डी.के पाटील, नरेंद्र होनराव,सुभाष निंबाळकर, प्रा.संतोष लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी खेळाडूंचा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थासचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक पोपट केदार ( क्रीडा नियंत्रक ), बिभीषण माने व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
तसेच या यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला खजिनदार शंकरराव सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेशजी झपके, पर्यवेक्षक अजय बारबोले, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.