सांगोला तालुका धनगर समाज सेवा मंडळ यांच्यावतीने महाराजा यशवंतराव होळकर जयंती साजरी

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला येथे सांगोला तालुका धनगर समाज सेवा मंडळ यांच्यावतीने महाराजा यशवंतराव होळकर यांची 248 वी जयंती मोठया उत्साही वातावरणात काल रविवार दि.3 डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी हरीभाऊ पाटील यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली. यावेळी बिरूदेव गजीढोल ओवीकार मंडळानेे होळकर शाहीचा इतिहास सांगितला.
यावेळी शिवाजीराव मेटकरी, बाळासाहेब मस्के, हरीभाऊ पाटील, बिरूदेव शिंगाडे, बंडूनाना मासाळ, विलास देवकते, संतोष बुरूंगले, रविराज मस्के, उल्हास मेटकरी, राहुल मस्के, डॉ.सुशांत पिंजारी, हेमंत माने, अक्षय मस्के, हरीभाऊ वाघमोडे, किशोर म्हमाणे, नितिन हजारे, गणेश हजारे, संतोष मस्के, रावसाहेब मेटकरी, मच्छिंद्र मेटकरी, दिलीप वाघमोडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.