भाऊसाहेब महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात

नंदेश्वर ता-मंगळवेढा येथील श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली यांचे शिष्य श्री समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराज यांच्या दहाव्या पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते विणापुजन व ग्रंथपुजनाने करण्यात आली. सायंकाळी ठिक सहा वाजता पालखीची नंदेश्वर नगरीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. रात्री किर्तनसेवा,बारा अभंग,आरती व जागर झाला.
दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी ठिक सात वाजता पूजा करण्यात आली. नऊ वाजता सद्गुरु महिला भजनी मंडळ मुंबई व श्रीराम भजनी मंडळ नंदेश्वर यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला.अकरा वाजता श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांचे प्रवचन झाले व दुपारी ठिक बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादानंतर पुण्यतिथी सोहळ्याची उत्साहात सांगता करण्यात आली.या सोहळ्यासाठी मुंबई,रायगड,पुणे व उस्मानाबाद येथून गुरु बंधू-भगिनी नंंदेश्वर येथे दाखल झाले होते.