जागतिक रक्तदान दिनानिमित्त मुख्य डाकघर पंढरपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन…..

दिनांक 14 जून “जागतिक रक्त दान दिन” या निमित्त पंढरपूर येथील मुख्य डाकघर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
बजाज रक्त पेधी पंढरपूर आणि मुख्य डाक घर पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक मा. श्री. सी.बी.भोर सर, सहा.डाक अधीक्षक श्री. आर.बी.घायाळ ,डाक निरीक्षक श्री.एच. डी.चव्हाण सर, श्री.सचिन इमडे श्रीम.मेहता मॅडम , ब्लड बँक चे सचिव डॉ. श्री. सोनवणेपोस्ट मास्तर श्री. बंडगर सर, यांच्या उपस्थित मध्ये कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे नियोजन पंढरपूर विभागाचे नेशनलं असोशियशन ऑफ पोस्टल EMPLOYEES चे सचिव श्री.शिवाजी तोंडले आणि त्याच्या टीमने उत्तम केल्याबद्दल सर्वच मान्यवरांनी गौरव उद्गार काढले.
जवळपास ५० व्यातीनी या रक्तदान शिबिरात उस्फूर्तपणे सहभाग नोदविला..सहभागी व्यक्तींना आकर्षक भेट वस्तू आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
बजाज रक्त पेढी येथील सर्व कमचारी बंधू आणि भगिनी यांनी जो सेवाभाव जपला त्याबद्दल यांचे गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त केले…