सावे माध्यमिक विद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत कार्यक्रम संपन्न .

सावे माध्यमिक विद्यालयात आज 15 जून रोजी शैक्षणिक वर्ष 2023- 24 या वर्षामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता आठवी, नववी व दहावी मधील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री शेळके सर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला पंचायत समितीचे माजी उपसभापती व सांगोला मार्केट कमिटीचे नूतन संचालक सन्माननीय श्री संतोषजी देवकते उपस्थित होते. सर्वप्रथम संतोष जी देवकते यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.
त्यानंतर इयत्ता आठवी, नववी व दहावी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्वागत माजी उपसभापती संतोषजी देवकते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन करण्यात आला. त्यानंतर इयत्ता आठवी मधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. सदर कार्यक्रमास पालक श्री धोंडीराम अंकुशराव, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर तर आभार प्रदर्शन श्री बर्गे सर यांनी मानले.