कोळा येथे एनसीसी कॅम्पला डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील बार्शी कुर्डूवाडी सोलापूर अक्कलकोट पंढरपूर करमाळा मंगळवेढा माळशिरस माढा कुर्डूवाडी मोहोळ या भागातील एनसीसी विद्यार्थ्यांसाठी कॅम्प कोळ्यासारखे ग्रामीण भागात आयोजन करून महाराष्ट्र बटालियन चे कर्नल राजेश गजराज कर्नल विक्रम जाधव यांनी गोरगरीब मुलांसाठी चांगले काम केले असून त्याचे कार्य कौतुकास्पद असून या कॅम्पमुळे विद्यार्थ्याला नवी ऊर्जा मिळते असे विचार शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
सदिच्छा भेट देऊन विद्यार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी डॉ देशमुख बोलत होते. कोळे ता सांगोला येथे डॉ. पतंगराव कदम शिक्षण संस्था संचलित दीपक आबा साळुंखे महाविद्यालयात एनसीसी कॅम्प च्या वतीने डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा शाल श्रीफळ फेटा देऊन सुभेदार प्रेमानंद सर संस्थेचे संस्थापक दीपक राव माने यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी सर्व नेतेमंडळी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले एनसीसी कॅम्प मुळे तरुणांना चांगली संधी उपलब्ध कोळ्यासारख्या ग्रामीण भागात झाली असून जिल्हा स्तरावरील हजारो विद्यार्थ्यांचे एनसीसी शिबीर एक महिनाभर सुरू असल्याचे समजले या शिबिरामुळे ग्रामीण भागातील सैन्य दलात जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सैनिकी जीवनाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार असुन एनसीसीमधील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शस्त्रांची माहिती, युद्धकला, नेमबाजी, परेड आदी प्रकारचे प्रशिक्षण या शिबिराला भेट दिल्यानंतर माहिती मिळाली असे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेवटी सांगितले.
यावेळी सुभेदार मेजर अरुणकुमार ठाकूर, सुभेदार प्रेमानंद एनसीसी अधिकारी लेप्टनंट सुल्ताना पठाण, कॅप्टन भीमाशंकर व्हनमाने सुभेदार ठाकूर, सुभेदार रामचंद्र, हवालदार नानासाहेब साठे, हवालदार दीपक पाटील संस्थापक अध्यक्ष दीपक माने,मारुती सरगर, कुंडलिक आलदर, रफिक तांबोळी, लोकनेते रमेश कोळेकर (पंच) पत्रकार जगदीश कुलकर्णी, विनोद कोळेकर यश करांडे अनिकेत पोरे, सचिव अमोल माने, काशिलिंग व्हनमाने, प्राचार्य प्रकाश आलदर,संचालक शरद माने बाळासाहेब करांडे, समाजसेवक समाधान बोबडे, बाळासाहेब कोळेकर,यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.