सांगोला विद्यामंदिरमध्ये एस.एस.सी बोर्ड परीक्षा २०२३ मधील ६६ गुणवंताचा सत्कार; ९०% पेक्षा जास्त गुणाचे ६६ गुणवंत विद्यार्थी

सांगोला -(प्रतिनिधी) मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील ६६ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळविले. यामधील २५ विद्यार्थ्यांनी ९५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून तर संस्कृत विषयामध्ये अकरा विद्यार्थ्यांनी व गणित विषयांमध्ये चार विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे प्रमुख पाहुणे तहसीलदार संजय खडतरे,व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव म.शं.घोंगडे, माजी प्राचार्य भीमाशंकर पैलवान, लक्ष्मण जांगळे, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभिषण माने, पोपट केदार उपस्थित होते. सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास तहसीलदार संजय खडतरे यांचे हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे तहसीलदार संजय खडतरे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थी घडविण्यात नेहमीच अग्रेसर असणारी शाळा म्हणजे सांगोला विद्यामंदिर होय. विद्यार्थ्यांनी मात्र प्रयत्न व सराव यामध्ये सातत्य ठेवावे असे सांगितले.यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य लक्ष्मण जांगळे सर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जांगळे सरांनी आपल्या यशस्वी सेवेबरोबर शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
गुणवंत विद्यार्थिनी कुमारी साक्षी माने हिने आमच्या यशामध्ये पालक सर्व मार्गदर्शक शिक्षक व संस्था यांचा मोलाचा वाटा आहे असे विचार व्यक्त केले त्याचबरोबर पालक मुख्याध्यापक सिद्धेश्वर इंगोले यांनी शाळेबद्दल कृतार्थतेची भावना व्यक्त करून सर्व मार्गदर्शक विषय शिक्षकांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला, शेवटी सौ. सुरेखा इंगोले मॅडम यांनी शाळेविषयी स्वरचित कविता सादर केली.
अध्यक्षीय भाषणात संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांनी आपले विचार व्यक्त करताना शाळेच्या यशस्वीतेचा इतिहास व परंपरा थोडक्यात सांगत ती कायम टिकवल्याबद्दल विद्यार्थी शिक्षक पालक यांचे अभिनंदन करून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक बिभीषण माने यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशांत रायचुरे, वैभव कोठावळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार व चहापानाने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button