आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संघटाना बांधणीला गती द्या – युवासेना विस्तारक उत्तम आयवळे

 

आगामी जिल्हापरिषद पंचायत समीती नगरपालीका ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी संघटना बांधणी साठी कामाला लागण्याचे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना सोलापूर जिल्हा विस्तारक उत्तम आयवळे यांनी सांगोला येथील युवासेना बैठकीत पदाधिकाऱ्यांना केले.
सांगोला येथील सदानंद हाॅटेल येथे युवासेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पुढे बोलताना उत्तम आयवळे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी प्रचंड सहानभुती व गद्दारां विरोधात प्रचंड संताप आहे. सर्व सामान्य जनता निवडणुकांची वाट पाहत आहे. मात्र ही लढाई जिंकण्यासाठी आपले संघटन देखील मजबूत असायला हवे. बुथ प्रमुखांपासून, शाखा प्रमुख, गट प्रमुख, विभाग प्रमुख उपतालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक जिल्हापरिषद गट, पंचायत समीती गण तसेच ग्रामपंचायत वाॅर्डातील समस्या, मतदार याद्या, स्थानिक समीकरणे यांची खडानखडा माहती घेऊन त्यादृष्टीने काम केले पाहीजे असे ते म्हणाले.
यावेळेस अनेक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील आयवळे यांच्या हस्ते करण्यात आल्या. तसेच पदं घेऊन काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील खडे बोल सुनावले आहेत.
या वेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, तालुका समन्वयक भारत मोरे, उपजिल्हाप्रमुख रघुनाथ गायकवाड, युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले, तालुका समन्वयक शंकर मेटकरी, शहरप्रमुख सौरभ चव्हाण, शाखाप्रमुख समाधान चव्हाण आरोग्य सेना समन्वयक नवल गाडे विभागप्रमुख रघुनाथ आयवळे यांच्यासह पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

चौकट
ज्यांना आपण जिवाचे रान करून आमदार केले ते गद्दार झाले आगामी निवडणुकीत त्याचा पुरता बिमोड करू व सांगोला तालुक्यातील गद्दारांना धडा शिकवू – शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa