नातेपुते गावातून जाणाऱ्या पालखी मार्गाच्या रस्त्याचे काम पूर्णत्वास : मालोजीराजे देशमुख

सोलापूर जिल्ह्यात माऊली पालखी सोहळ्याचे २३जून रोजी आगमन होत असुन पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम नातेपुते शहरात होत आहे तत्पूर्वी नातेपुते शहरातील नातेपुते गावातून जाणाऱ्या पालखी मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, बांधकाम सभापती अतुल पाटील, तसेच नगरसेवक यांनी आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालखी महामार्गावरील सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन या विभागातील ठेकेदार जे.एम. म्हात्रे अँड कंपनी यांनी संपूर्ण काम करून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात आले आहेत. माऊलींचा पालखी मार्ग आता सुखकर झाला असून ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले होते. तो रस्ता अता खड्डेमुक्त झाला आहे.
सोलापूर जिल्हा सरहद्दीपासून वेळापूर पर्यंत म्हात्रे कंपनीकडे पालखी महामार्गाचे काम आहे. जिल्हा सरहद्दीवर जवळ पालखी ज्या ठिकाणी थांबते तेथील काम तसेच नातेपुते शहरात ज्या जुन्या मार्गाने पालखी सोहळा जातो त्या जुन्या मार्गाचे मजबुतीकरण दोन्ही बाजूस पुर्ण केले आहे. कारण नातेपुते आणि माळशिरस येथे बायपास झालेला आहे. परंतु, पालखी सोहळा मात्र जुन्या मार्गानेच गावात येणार आहे. व जुन्या मार्गानेच पंढरपूर ते आळंदी नातेपुते येथून मार्गस्त होणार आहे. त्यामुळे या मार्गाचे डांबरीकरणाचे काम नातेपुते
नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, बांधकाम सभापती अतुल पाटील
तसेच नगरसेवक यांनी पयत्न करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा नातेपुते येथे येण्यापूर्वीच पूर्ण केला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यातील वारकरी मंडळी व वाहनांना येथील रस्त्यावरील खड्ड्यांचा होणारा त्रास खड्डा मुक्त झाल्याने सुखकर होणार आहे
नातेपुते,माळशिरस शहरातील पालखी महामार्गावरील शहरातील रोडचे रुंदीकरण, दुभाजक, विद्युत खांब, दोन्हीकडून गटारींची कामे राष्ट्रीय महामार्ग खात्यामार्फत होण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कडे आमदार राम सातपुते,आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यामार्फत आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला होता त्यास काही प्रमाणात यश आले आहे –
बाबाराजे देशमुख,( सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते.. )