*विज्ञान मंडळाचे वतीने दहावीतील गुणवंतांचा सत्कार संपन्न

सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ संलग्न सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक प्रशालेतील विज्ञान विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम रविवारी न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे पार पडला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा, पालकांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच 2022-23 मधील सांगोला तालुका आदर्श विज्ञान शिक्षक श्री. मनेरी सर यांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्री. विठ्ठलराव शिंदे सर होते , त्यांनी जिद्द चिकाटी, परिश्रम केल्यास यश मिळते या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. झपके सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले .तसेच प्राचार्य गंगाधर घोंगडे सर यांनी मार्गदर्शन केले, या कार्यक्रमासाठी प्रा. लक्ष्मण विधाते सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष श्री. बेहेरे सर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. लिंगे सर, सचिव श्री लुंगारे सर रणदिवे सर, सपाटे सर, सौ घोंगडे मॅडम, गुळमिरे मॅडम, इंगोले मॅडम व सर्व विज्ञान अध्यापक मंडळातील सदस्यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लिगाडे सर यांनी केले व आभार श्री. सुरवसे सर यांनी मानले.