सांगोला शहरात चौंडेश्वरी देवीची मिरवणूक मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न

सांगोला : सांगोला शहरात चौंडेश्वरी देवीची अमावस्यानिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.
चौंडेश्वर देवीच्या मिरवणूकीला देवांग कोष्टी समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पारंपारिक पद्धतीमध्ये ही मिरवणूक प्रत्येक वर्षी करण्यात येते.
देवांग कोष्टी समाजातील सुहासिनी महिलांसाठी प्रसादाचे आयोजन केलेले असते. यावर्षीही या कार्यक्रमासाठी सुहासिनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. व दुसऱ्या दिवशी शहरातून देवीची मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक चौंडेश्वरी मंदिरापासून सुरू होऊन मेन रोडने हनुमान मंदिर येथे या मिरवणुकीच्या शेवट होतो. या मिरवणुकीसाठीही देवांग कोष्टी समाजाबरोबर इतरही समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात.