टेंभू योजनेचे पाणी माणनदीत सोडावे व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

खवासपुर मध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असुन वारंवार मागणी करूनही महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचा सहा महिने गावात व वाड्यावस्त्यांवर पाणी पुरवठा बंद आहे गावातील ग्रामस्थांनी गेल्या महिन्यात गटविकास अधिकाऱ्यांना व महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना वारंवार मागणी करूनही पाणी मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे तातडीने टॉकर सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात अनेक वेळा निवेदन दिले तरी तो सुरू केला जात नाही टेंभू योजनेच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यातील एक किलो मीटर शेजारच्या विठलापुर गावापर्यंत पाणी आले होते ते पाणी आपल्या तालुक्यातील खवासपुर येथील माण नदीत सोडले असते तर पिण्याच्या व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला असता परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासन जाणिवपूर्वक या टंचाई कडे दुर्लक्ष करत आहेत पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे शेतातील थोडीफार पिकं करपून जाऊ लागली आहेत यासाठी लवकरात लवकर टॅकर व टेंभू योजनेचे पाणी सुरू न केल्यास सर्व ग्रामस्थांना घेऊन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा खवासपुर येथील शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.