रामचंद्र झिरपे गुरुजी यांचे दुःखद निधन

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला शहरातील कुंभार गल्ली येथील रामचंद्र सिद्धेश्वर झिरपे गुरुजी यांचे रविवार दि.१८ जून रोजी मिरज येथे उपचारादरम्यान रात्री ८ च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.माजी प्राचार्य म.सि.झिरपे सर यांचे ते थोरले बंधू होते. निधनासमयी त्यांचे वय ८८ वर्षे होते. लहान थोर अशा सर्व वयोगटातील नागरिकांशी आपल्या आपुलकीपूर्वक वागण्याने लोकप्रिय असणारे झिरपे गुरुजींनी सांगोला शहरातील जिल्हा परिषद शाळेत अध्यापन केल्याने त्यांचा विद्यार्थीवर्ग ही मोठा आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुली,पुतणे,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा तिसऱ्या दिवशीचा विधी आज मंगळवार दि.२० जून रोजी सकाळी ७:३० वाजता लिंगायत स्मशानभूमी, वाढेगाव नाका येथे असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी कळविले आहे.