चैतन्य जप प्रकल्पाचे 23 व्या राज्यस्तरीय शिबीराचे सांगोल्यात होणार आयोजन

सांगोला(प्रतिनिधी):- गेल्या 22 वर्षापासून अखंडपणे रामनाम सुरु असलेले चैतन्य जप प्रकल्पाचे 23 वे राज्यस्तरीय शिबीर नोव्हेंबर 2023 मध्ये  सांगोला जि.सोलापूर येथे आयोजीत करण्यात येणार असल्याची घोषणा चैतन्य जप प्रकल्पाचे  कार्याध्यक्ष धैर्यशील भाऊ देशमुख यांनी केली.
चैतन्य जप प्रकल्प शिबीराच्या आयोजना संदर्भात चर्चा करण्यासाठी काल रविवार दि.18 जून रोजी अकलूज येथे प्रकल्प सेवेकरी व जपकरांची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस अध्यक्ष नंदकुमार जोशी, कारभार विभाग प्रमुख राजेंद्र आगवणे सर, प्रचार व प्रसार विभाग प्रमुख श्री.जगताप गुरुजी, विश्वस्थ अर्जुनभाऊ जाधव, महासेवेकरी साहेबराव आण्णा देशमुख, आर्थिक विभाग प्रमुख श्री.विजय लोंढे, प्रज्ञाराम विभाग प्रमुख शिवशंकर कुरुडकर तसेच अकलूज, दहिवडी, नातेपुते, लोणंद, इंदापुर, फलटण, बारामती, गोंदवले, सांगोल्यासह महाराष्ट्रात राज्यातून सर्व रामनाम सेवेकरी, जपकार व नामप्रेमी उपस्थित होते.
सदर शिबीर हे तीन दिवस चालणार असून या शिबीरामध्ये अध्यात्मिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, अखंड रामनाम जप, श्री महाराजांची भव्य शोभयात्रा, किर्तन, प्रवचन, रक्तदान शिबीरासह वृक्षारोपण आदी कार्यक्रम होणार आहेत.
या बैठकीस सांगोला तालुक्यातून विठ्ठल गोडसे, इंजि.मधुकर कांबळे, इंजि.संतोष भोसले, अच्युत फुले, सुखानंद हळ्ळीसागर, प्रकाश सुर्वे, सतीश बिडकर, प्रसाद महादार, अनिल चोथे, गणेश पिंपळे, रविंद्र कदम, चेतन कोवाळे सर, राहुल देवकर, आदी सेवेकरी, जपकार व नामप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button