सांगोला विद्यामंदिरमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा; विद्यार्थी व शिक्षकांनी केली योग प्रात्यक्षिके

सांगोला( प्रतिनिधी )बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरावर विपरित परिणाम होत आहेत. यासाठी शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी योगाची आवश्यकता संपूर्ण जगाने अंगीकारली आहे.यानुसार २१ जून हा दिवस जागतिक पातळीवरती आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.याचे औचित्य साधत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी योगगुरू चैतन्य हास्यक्लबचे श्री. डिंगबर जगताप सर, डोंबे गुरूजी योगशिक्षक म्हणून उपस्थित होते.. त्यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले.तसेच योग प्रात्यक्षिके सादर करत विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कडून योग प्रात्यक्षिके करून घेतली.
या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शाहिदा सय्यद ,पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभिषण माने, पोपट केदार यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.