श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेत योग दिन उत्साहात साजरा

श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेत आंतरराष्ट्रीय नववा योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अकोला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सतीश राऊत यांनी योगासने प्राणायाम व आसनाचे विविध प्रकार करून दाखवले व आरोग्य विषयी माहिती सांगितली. सर्व आसने माणसाच्या आरोग्यासाठी व निरोगी जीवनासाठी उपयुक्त आहेत. ‘करे योग रहे निरोग’ अशा प्रकारे आसने करून त्यांचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मनोहर इंगवले सर, सीनियर शिक्षक श्री. विजयकुमार जगताप सर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.