शिवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये जागतिक योग दिन साजरा

शिवणे वार्ताहर-21 जून हा दिवस संपूर्ण जगात योग दिन म्हणून साजरा केला जातो.यावर्षी त्याचे 9 वे वर्ष असून त्या दिनाचे औचित्य साधून शिवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजआणि एन.एस.एस.विभागाच्या वतीने मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासाठी योग सल्लागार सौ.दीपाली आलदर,श्रीमती सुरेखा माने यांनी योग प्रात्यक्षिक करून दाखविली .यामध्ये व्यायाम प्राणायाम,विविध आसन प्रकार करून दाखविले विद्यालयातील विज्ञान शिक्षक अतुल लुंगारे,प्रा.शोभनतारा मेटकरी ,ओंकार गुजरे 10 वी अ, सानिका घाडगे 12 वी विज्ञान यांनीही या प्रत्यक्षिकात सहभाग घेतला.
सदर प्रात्यक्षिक संपल्यावर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तर्फे वरील मान्यवरांचा प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांच्या हस्ते शाल आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.शोभनतारा मेटकरी यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक स्टाफ,आणि कर्मचारी यांनी कष्ट घेतले.