सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये योग दिन संपन्न.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये २१जून आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी पतंजली योग समितीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रत्नप्रभा माळी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. सविता लाटणे, माजी अध्यक्षा सौ. माधुरी गुळमिरे, सौ. सुनंदा माळी, डाॅ. आश्विनी बिपीन माळी, पतंजली योग समिती सदस्या सौ.मंदाकिनी येलपले,सौ.सुरेखा व्हटे,सौ.वनिता व्हटे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवातीला कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला. यानंतर उपस्थित पतंजली योग समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना प्राणायम व विविध आसने याबद्दल माहिती सांगितली. यामध्ये अनुलोम-विलोम, कपालभाती, भुजंगासन, ताडासन,सूर्यनमस्कार यांची प्रात्यक्षिके दाखवली व त्यांचे आरोग्यास होणारे फायदे सांगितले.
यावेळी डॉ. आश्विनी बिपीन माळी यांनी आहार व व्यायामाचे महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले यानिमित्ताने विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या आईपालकांची विशेष उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पल्लवी थोरात मॅडम यांनी केले.