नाझरा विद्यामंदिर मध्ये योग दिन उत्साहात साजरा

नाझरा( वार्ताहर);- सांगोला तालुक्यातील नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या जीवनात व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.व्यायामामुळे शरीराची भक्कमता तर निर्माण होतेच पण त्याबरोबर मानसिक सदृढताही निर्माण होते.दररोज योगासन केल्यामुळे आपले जीवन आनंदी व उत्साही राहते म्हणूनच गेल्या नऊ वर्षापासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.
आज नाझरा विद्यामंदिरच्या प्रांगणात ही योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर क्रीडाशिक्षक चारुदत्त जगताप यांच्या सूत्रसंचालनातुन संभाजी सरगर यांनी योगाचे विविध प्रकार सादर केले. या योग शिबिर कार्यक्रमास पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्यासह प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.