शरीर श्वास व मन यांचे एकत्रिकरण म्हणजे- योग माजी विद्यार्थिनी कुमारी. आकांक्षा कुलकर्णी

विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपले शरीर तंदुरुस्त असणे गरजेचे असते,त्यासाठी विद्यार्थ्यांनी शरीर मन व श्वास यांचा एकत्रित अभ्यास म्हणजेच योगा व प्राणायाम केले पाहिजे असे मत शाळेची माजी विद्यार्थिनी व आर्ट ऑफ लिविंग ची् स्वयंसेविका कुमारी .आकांक्षा कुलकर्णी हिने व्यक्त केले .
21 जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो. उत्कर्ष विद्यालयामध्ये नववा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर कर्नाळा चारिटेबल ट्रस्ट पुणे चे चंद्रकांत शहासने ,कुमारी.आकांक्षा कुलकर्णी उपस्थित होते.
वरील योग दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून चंद्रकांत सरांनी अ ते अ:या स्वरांवर आधारित योगाची प्रात्यक्षिके घेऊन स्मरणशक्ती व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ची ब्रेन चेंजिंग थेरेपी ही प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. तसेच कुमारी. आकांक्षा हिने सूर्यनमस्कार योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले .
तिसरी ते दहावीचे सर्व विद्यार्थी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते .
कार्यक्रमासाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्याप सुनील कुलकर्णी सर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मागाडे बाई, उपमुख्याध्यापिका कुलकर्णी बाई पूर्व प्राथमिक च्या मुख्याध्यापिका सुनीताताई तसेच इयत्ता पाचवी ते सातवीचे पर्यवेक्षक भोसले सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन क्रीडा शिक्षक सचिन गोतसूर्य सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शुभांगी कवठेकर यांनी केले. सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या उत्साहात संपन्न झाला.