जवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात आनंदात साजरा होत असून सर्वांनी योगाचे धडे घ्यावेत त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. आपले शरीर योगामुळे निरोगी राहण्यास मदत होते. असे प्रतिपादन जवळे येथील आर्ट ऑफ लिविंगचे योग प्रशिक्षक श्री.राजू वाघमारे यांनी व्यक्त केले.
कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले- सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे या प्रशालेमध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी योग प्रशिक्षक राजू वाघमारे बोलत होते.
पुढे बोलताना राजू वाघमारे म्हणाले वर्षातून 365 दिवस दररोज सर्वांनी योग दिन साजरा करावा त्यामुळे आपले शरीर कायमस्वरूपी निरोगी राहिल्याशिवाय राहणार नाही. योगामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवांना व्यवस्थित काम करण्यास मदत होते. योगामुळे आपला दिवस आनंदात उत्साहात जातो. असे सांगून योग प्रशिक्षक श्री. राजू वाघमारे यांनी योगाचे महत्त्व आपल्या मनोगतातून विशद केले. जवळे प्रशालेच्या प्रांगणामध्ये सकाळच्या सत्रात योग प्रशिक्षक राजू वाघमारे यांनी विविध प्रकारच्या योगाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसमोर सादर करीत. ती विद्यार्थ्यांकडून करवून घेतली. तसेच प्रशालेतील शिक्षकांनी अतिशय उत्साहात योगाची प्रात्यक्षिके केली.
याप्रसंगी योग प्रशिक्षक राजू वाघमारे यांचा सत्कार ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री.ए जी गायकवाड सर यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर प्रसंगी प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर, उप मुख्याध्यापक श्री.संजय पोळ सर, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.