हलदहिवडी विद्यालय व ज्युनि. कॉलेज हलदहिवडीमध्ये दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

दिनांक 18 6 2023 रोजी हलदहिवडी विद्यालय व ज्युनि.कॉलेज हलदहिवडी येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे जेष्ठ संचालक विश्वनाथ (नाना) चव्हाण यांनी भूषवले तसेच ज्येष्ठ सदस्य विलास येडगे व प्राध्यापिका सौ अपर्णा येडगे मॅडम उपस्थित होत्या.या सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले तर प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.सत्कारानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हलदहिवडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रामचंद्र जानकर सर यांनी केले त्यांनी शाळेमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
त्यानंतर सहशिक्षक शिवाजी चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी इयत्ता बारावी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी संजय कांबळे, वासुदेव ढोले, जगदीश होवाळ, लखन पारसे उपस्थित होते तर दहावी मधील विद्यार्थ्यांचे पालक म्हणून मोहन चोरमले, दत्तात्रेय झुरे, बाळासाहेब फाळके, पांडुरंग भजनावळे, मौलाना मनेरी, संजय फाळके, गोरख मासाळ, हिम्मत तांबोळी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यानंतर इयत्ता बारावी मधील कुमारी अर्चना पांडुरंग देवकते हिने आपले मनोगत व्यक्त केले तसेच दहावी मधील कुमारी शुभांगी पांडुरंग भजनावळे तिनेही आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेल्या आदरणीय विश्वनाथ चव्हाण यांनी आपल्या मनोगत आतून शाळेच्या शैक्षणिक प्रगती विषयी मार्गदर्शन केले तसेच पालकांनी जागरूक राहून पाल्याकडे लक्ष द्यावे असे सुचित केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे सर यांनी केली तर आभार फुले सर यांनी मानले