इनरव्हील क्लब तर्फे ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

सांगोला (प्रतिनिधी):- इनरव्हील क्लब सांगोला यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय योगा डे हा न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज सांगोला , सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल व अंगणवाडी शाळा खडतरे गल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष सौ रत्नप्रभा माळी यांनी योगा विषयी मार्गदर्शन व योगा प्रशिक्षण दिले . सदर योगा डे कार्यक्रमासाठी शहरातून बरेच मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्षा सौ सविता लाटणे माजी अध्यक्ष सौ रत्नप्रभा माळी ,सौ प्रतिभा माळी, सौ मंगल लाटणे, सौ माधुरी गुळमिरे सौ मंगल चौगुले,सौ अरुणा घोंगडे , अंकिता आनेकर ,सौ संगीता चौगुले सौ पल्लवी थोरात सौ विजया खडतरे, स्वाती ठोंबरे आणि इनरव्हील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.