“झाडे जगवा, बक्षीस मिळवा” या उपक्रमांतर्गत तरंगेवाडीमधील 21 विद्यार्थ्यांना दिले शैक्षणिक साहित्य बक्षीस.

सांगोला(प्रतिनिधी) ऑक्सिजन अभावी कोरोना काळात अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले तसेच सध्या पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळे तापमानात वाढ झाली असून वेळेवर पाऊस पडत नाही यासाठी पर्यावरण संतुलन ठेवण्यास झाड लावणे व ते जगविणे गरजेचे आहे.या उद्देशाने मागील वर्षी मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त तरंगेवाडी गावातील पाच जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांच्यावतीने उपक्रमशील व पर्यावरणप्रेमी शिक्षक खुशालद्दिन शेख यांनी स्वखर्चातून 501 वटवृक्ष तरंगेवाडी गावात लावले होते. 501 वटवृक्ष चांगले जगविणाऱ्या 21 विद्यार्थ्यांना शिक्षक शेख यांच्यावतीने सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या शुभहस्ते विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा प्रत्येकी एक हजार रुपये किमतीचे शैक्षणिक बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
तरंगेवाडी गावातील जि. प. शाळा सांगोलकर गवळीवस्ती, तरंगेवाडी, बंडगरवस्ती, पवार कोळेकरवस्ती व गावडेवाडी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला होता. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशा तळे, माजी सरपंच सुरेश गावडे, शरद खताळ शिक्षक श्रीमंत गावडे, सुशांत शिंत्रे, गणेश व्हनखंडे बहुसंख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक खुशालद्दीन शेख यांनी केले तर सूत्रसंचालन सुहास कुलकर्णी यांनी केले.
पर्यावरणप्रेमी शिक्षक खुशालद्दिन शेख यांनी पगारातून 21 विद्यार्थ्यांना शाळेची बॅग, जेवणाचा स्टीलचा डब्बा, पाटी, कंपास, अर्धा डझन वही, पाण्याची बाटली, पेन, पेन्सिल असे प्रत्येकी एक हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य उत्कृष्ट वटवृक्ष जतन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले